Ad will apear here
Next
ठाणे जिल्हा कलाध्यापक संघातर्फे कृतीसत्राचे आयोजन
विदुर चौधरी जिल्हास्तरीय कलातपस्वी पुरस्काराने सन्मानित
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना कलाशिक्षक विदुर चौधरी आणि कुटुंबीय.

ठाणे : जिल्हा कलाध्यापक संघ व जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील  मो. ह. विद्यालयात जिल्हास्तरीय कलाशिक्षक कृतीसत्र नुकतेच उत्साहात झाले. यात कलाध्यापक संघाकडून ग्रामीण भागातून दिला जाणारा जिल्हास्तरीय कलातपस्वी पुरस्कार कलाशिक्षक विदुर बच्चू चौधरी यांना कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार शहरी व ग्रामीण अशा दोन भागात दिला जातो. चौधरी हे सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणविषयक उपक्रमात सहभागी होत असून, ते उत्तम सूत्रसंचालक आहेत. अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. साहित्य व कलाक्षेत्रात त्यांना आतापर्यंत वीस पुरस्कार मिळाले आहेत. ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित कवी म्हणून सन्मान मिळाला होता.

चित्रकार, कवी, सूत्रसंचालक, हार्मोनिअम वादक, तसेच एक संवेदनशील माणूस म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. या कृतीसत्राचे सूत्रसंचालनही चौधरी यांनी केले. या वेळी विद्यासेवक पतपेढी अध्यक्ष सुधीर घागस, मो. ह. विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र राजपूत, भास्कर तिखे, ठाणे जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष दिगंबर बेंडाळे, विलास सेसाने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZKNBV
Similar Posts
पडघा केंद्राची मासिक शिक्षण परिषद उत्साहात भिवंडी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या २०१५पासून सुरू केलेल्या उपक्रमांतर्गत शिक्षणात होणाऱ्या बदलांवर चिकित्सा व्हावी व शिक्षकांना योग्य माहिती मिळावी म्हणून भिवंडी तालुक्यातील पडघा शैक्षणिक केंद्राची मासिक शिक्षण परिषद पडघा-समतानगर बोरिवली जिल्हा परिषद मराठी शाळेत नुकतीच पार पाडली.
मासवण आश्रमशाळेत रंगला ‘संवाद शब्दांचा शब्दांशी’ पालघर : साहित्यविषयक रुची व ज्ञान वाढीस लागावे आणि आपली बोली भाषा जतन व्हावी म्हणून वसई येथील शब्दांगण प्रस्तुत ‘संवाद शब्दांचा शब्दांशी’ या उपक्रमाचा २४वा प्रयोग पालघर येथील मासवण आश्रमशाळेत झाला.
प्रा. विकास उबाळेंना अर्थशास्त्राची डॉक्टरेट भिवंडी : बीएनएन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक विकास उबाळे यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली.
सावंदे जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती भिवंडी : स्त्री शिक्षणाचे बीज रोवणाऱ्या समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती तालुक्यातील सावंदे जिल्हा परिषद शाळेत साजरी करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language